ना रंगाचे ना रेषांचे , तालाचे ना लयीचे
आकाराचे ना विकाराचे, नाहीत कुठले पाश
वा-यावरल्या पाखराचे, माझे मुक्त आकाश
भिरभिरत्या नजरेत, साठवतो नियतीचे इशारे
रात्रीच्या डोहात माझिच प्रतिमा शहारे
कंठही होतो कोरडा न निशब्द
आवाज फुटत नाही, मूठ वळते फक्त ..
चिरडत्या भावनांचे, कानी येती आक्रोश
मीच फाडू लागतो, भोवतीचा कोष
मला उडायचे, जगायचे उन्मुक्त ..
असेच ना मरायचे गोठवून रक्त ..
उन्मुक्त उडण्याची जेव्हा ओढ लागते धरू
फडफडत्या ज्वालांतून ही उडते फुलपाखरू ..
३ टिप्पण्या:
सुंदरच आहे कविता. पण शेवटची ओळ
फडफडत्या ज्वालांतून ही उडते फुलपाखरू
अशी हवी होती .
प्रोफाईल्स चाळत चाळत तुमच्या प्रोफाईलपर्यंत पोचलो. पहिली कविता खूप आवडली, इतर कवितांचं वाचन चालू आहे.
hi vachayala navhati dilis mala...
helavaNari aahe...
टिप्पणी पोस्ट करा