एक पान सुकलेलं,
वा~यानं ही फुंकलेलं
वेड्या स्वप्नांमागे
पळत सुट्लेलं ..
एक् पान चिंब ओलं,
पावसालाच भ्यायलं
कोंब कोवळा पाहून
स्वत:वरच हसलं..
एक पान खरंड्लेलं,
काळ्या शाईनं भरडलेलं
कोण्या वेड्यासाठी
खूप हमसून रड्लेलं..
एक पान नव्व कोरं,
ऐटीमध्ये मिरवणारं
माझ्या शब्दांना
पोटी रूजवणारं..
एक् पान शेवटचं,
कध्धीच न हसणारं
नको म्हटलं तरीही
हळूच समोर येणारं ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा